मुख्य पान


end-divider

lamp

नमस्कार !! दिपत्कार मधे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत !!!

आम्ही या संकेतस्थळावर दुर्मिळ व पुरातन दिव्यांचा संग्रहाबद्दल माहिती देत आहोत. कोणाला नाणी जमवण्याचा छंद असतो , तर कोणाला पोस्टाचे तिकिट जमवण्याचा . या छंदाचा नादही अगदी खुळा असतो . तहान भूक हरवून छंद जोपासण्याची प्रवृत्ती कधी जिवाला पिसे लावून जाते हे कळत नाही .तसेच पारंपरिक पणत्यांपासून ते आजच्या पुरातन दिव्यांचा पणत्यांची स्थित्यंतरे त्यांच्याकडे पाहायला मिळतात . अनेक प्रकारचे लामणदिवे , हत्तीच्या पोटात तेल टाकून पेटत राहणारा लामणदिवा , मोराचा लामणदिवा , अल्लाऊदिनचा दिवा , त्यांच्या संग्रहाचे आर्कषण . पणतीचा दिवा , अदिवासी दिवे , भिंतीला अडकवण्याचे दिवे , पुरातन , पेशवेकालीन समया , मुघलकालीन दिवे , गणपतीच्या समया , वेगवेगळ्या दिपमाळांच्या प्रतिकृती योगासनातले लामणदिवे , असा अनोखा दिव्यांचा संग्रह.

उतरत्या वयात छंद जोपासायचे हे तसे अवघड का आहे शिवाय घेत्लेलेला प्रत्येक दिवा स्वच्छकरून ,नियमित उजळून ठेवण्याचे पण माझे व्रत आहे . साहजिक या छंदात शारीरिक ,मानसिक व आर्थिक ताण या वयात सहन करणे अवघड जाते..आता एकही दिवा खरेदी करायचा नाही पण नवा दिवा दिसला कि मनाला वैताग ,नैराश्य नाहीस होत पुन्हा उभारी येते आणि नवा दिवा गृहप्रवेश करतो . छंद म्हटलकी कि जागा पण लागते ,त्यामुळे अलीकडेच आम्ही आमची सुंदर ४ खोल्याची पुण्यातील सदनिका विकली व थोडेसे धारीसठ करून धायरी गावात छोटासा स्वतंत्र बंगला बांधला . खास दिव्यांचा संग्रहासाठी नाव दिलंय दिपत्कार.

छायाचित्र संग्रह